२०/४/२०२३ --
सर्जेराव सखाराम पाटील हे म्हालसवडे ता कोल्हापूर येथे रहात असून सध्या कोटा राजस्थान येथे भारतीय सेनेमधे सिपाही म्हणून कार्यरतआहेत. त्यांना pilonidal sinus याचा त्रास होता यासाठी दि ६/४/२३ ते १०/४/२३ या काळात डॅा.बी.आर.कोरे, अश्विनी हॅास्पीटल कोंडा ओळ लक्ष्मीपूरी येथे यांचेवर छोटीसी यशस्वी शस्त्रक्रिया झाली, याचा खर्च रू १५००० झाला .वुई फॅार सोल्जर्स (वेफ्स) फौंडेशन तर्फे त्यांना रू ५००० चा चेकफौंडेशनचे उपाध्यक्ष दीपक गाडवे यांचे हस्ते देणेत आला. यावेळी फौंडेशनचे खजिनदार अनिल नागराळे व अध्यक्ष डॅा प्रकाश ओसवाल उपस्थित होते.
१८/५/२३ --
कोल्हापूर येथील १०९ टी ए मराठा बटालियन मधील जवान नायक बाळकृष्ण धोंड यांची ५/५/२३ रोजी जया
युरॅालॅाजी सेंटर कोल्हापूर येथे दुर्बीणीतून मूतखडा काढण्याची शस्त्रक्रिया डॅा विनय चौगूले यांनी यशस्वीरित्या केली, यासाठी जवळपास ५५,००० रू इतका खर्च आला. वुई फॅार सोल्जर्स तर्फे जवानांचे आपल्यावर असणारे ऋण कमी करण्याचे निमित्ताने रू १५,००० चा चेक देणेतआला यावेळी अध्यक्ष डॅा प्रकाश ओसवाल व खजिनदार अनिल नागराळे उपस्थित होते. विशेष म्हणजे नायक बाळकृष्ण धोंड हे उत्कृष्ट कूक असून ते रामबन (जम्मू काश्मीर) येथे कार्यरत असताना छत्रपती श्रीमंत शाहूमहाराज यांनी त्यांचे खास कौतुक केले होते.
११/६/२०२३ --
दत्तात्रय लक्ष्मण टोपले आपल्या कोल्हापुरात सर्वांना मैदानावर चिरमुरे फुटाणे विकणारी व्यक्ती म्हणून
परिचीत असली तरी ते १९७५ साली भारतीय सेनेमधे दाखल झाले होते व १८ वर्षे देशसेवा करून हवालदार
म्हणून निवृत्त झाले. दुर्दैवाने कांही कारणास्तव त्यांना पेन्शन न मिळाल्याने सायकलवरून चिरमुरे
फुटाणे भडंग विकून उदरनिर्वाह करत असतात.
वुई फॅार सोल्जर्स (वेफ्स) फौंडेशन चे कार्य माहीत असल्यामुळे १०९ टी ए मराठा बटालियनचे
सुभेदार शिवाजी पाटील यांनी ट्रस्टशी संपर्क करून त्यांना मदत करणेची विनंती केली. त्यानुसार टोपले
यांना माहीती घेणेसाठी ट्रस्टचे कार्यालयात, दवाखान्यात बोलवून घेतले. माहीती घेता घेता त्यांनी
अलीकडे सायकल चालविताना दम लागतो असे सांगीतले. यासाठी तपासणी करताना त्यांच्या हृदयाच्या
ठोक्यामधे विकृती जाणवली (precordial murmur). त्यांना त्वरीत ट्रस्टशी सलग्न असणारे
कोल्हापूरांतील सुप्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॅा अक्षय बाफना यांचेकडे उपचारासाठी पाठविणेत आले, ते नेहमी
जवानांना त्यांच्या फीमधे सवलत देतात, याही रुग्णाला त्यांनी २१०० रू बिल झाले असता १३५० रू
घेतले यांबद्दल ट्रस्ट त्यांचा ऋणी आहे. रुग्णाच्या तपासणीअंती असे आढळले की हृदयाकडून सर्व शरीराला रक्तपुरवठा करणाऱी महत्वाची रक्तवाहीनी (Aorta) हिचा व्हॅाल्व अतिशय अरूंद झाला होता ( severe calcified aortic stenosis). यासाठी लवकरात लवकर open heart surgery करून व्हॅाल्व बदलावा लागणार होता.
जवानाचे वय ७० असलेने अवघड अशी ही शस्त्रक्रिया सीपीआर कोल्हापूर मधे हृदय शस्त्रक्रियातज्ञ
डॅा. देवरेसर, हृदयरोगतज्ञ डॅा. बाफना सर व भूलतज्ञ डॉ. हेमलता देसाई व त्यांच्या टीम ने ११ मे रोजी
यशस्वी केली. या टीम चे खूप मोलाचे सहकार्य लाभले, त्यांचे आभार मानावे तितके थोडेच होईल. कारण
खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रिये करिता काही लाख रुपये खर्च आला असता पण डॉ बाफना यांच्या
सहकार्याने छत्रपती प्रमिला राजे या सरकारी रुग्णालयात फक्त आवश्यक त्या रक्ततपासण्या, ब्लड
ट्रान्सफ्यूजन, औषधे, ॲ ंजीयोग्राफी इत्यादीसाठींचा खर्च रू.१२३५० इतक्या माफक खर्चात झाली.
सदर खर्च व आवश्यक औषधेखर्च करिता काही रक्कम असा अल्प मदतीचा रू.२०,०००/- चा
चेक वुई फाॅर सोल्जर्स ट्रस्ट तर्फे हवालदार टोपले यांचे घरी जावून डॉ.ओसवाल, श्री.दीपक गाडवे, मुकुंद
कुलकर्णी, रमेश नंदेश्वर या ट्रस्टींच्या उपस्थितीत देणेत आला.